Saturday, June 13, 2020

मा.श्री.खा.शरद पवार विचार मंचच्या बीड.जिल्हाध्यक्षपदी श्रीनिवास देशमुख यांची निवड.


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- सबंध महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मा.श्री.शरद पवार विचार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी परळी वैजनाथ येथील युवक कार्यकर्ते श्रीनिवास बालासाहेब देशमुख यांची निवड झाली आहे.
संघटनेचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष मा.अमित अंकुशराव ढमाळ यांनी ही निवड केली असून या निवडीचे पत्रही श्री देशमुख यांना दिले आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजे 1996 पासून महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात ही संघटना कार्यरत असून विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविले जातात. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारी व आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने राज्यभर सामाजिक कार्य करणारी व तळागळातील सर्वसामान्यांना स्वावलंबी करून त्यांना हात बळकट करणारी ही संघटना आहे. या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री श्रीनिवास देशमुख यांचे येथील कार्यकर्ते व मित्र परिवारांनी अभिनंदन केले आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री ढमाळ यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्षपदी केलेली निवड सार्थ ठरवून दाखवू, संघटनेचे कार्य जिल्हाभरात वाढण्यासाठी प्रयत्न करू असेही या निवडीनंतर श्री देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment