Wednesday, June 10, 2020

परळी न.प.च्या स्वीकृत सदस्य म्हणुन राजेंद्र सोनी,चेतन सौंदळे यांची निवड.


परळी (प्रतिनीधी) परळी नगर परीषद कार्यालयात आज झालेल्या विशेष सभेत दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली.यात राजेंद्र सोनी व चेतन सौंद॓ळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
न.प.सभागृहात पीठासन अधिकारी नगराध्यक्षा सरोजिनी हालगे,मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड जाहिर करण्यात आली.
राज्याचे सामाजिक न्यायमंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळी नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या संख्येनुसार तीन स्वीकृत सदस्य घेतल्या जात असतात यामध्ये तीन स्वीकृत सदस्यांपैकी अजित कच्ची व जयप्रकाश लड्डा यांनी काही महिन्यापूर्वी आपल्या स्वीकृत सदस्य पदाचा राजीनामा दिल्यामुळे आज बुधवार दि. 10 जुन रोजी त्यांच्या जागी निवड करण्यात आली. या निवडीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे लॉबिंग करुन इच्छा व्यक्त केल्याने स्वीकृत सदस्यपदी कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. यात माजी नगरसेवक राजेंद्र सोनी व सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले राष्ट्रवादीत निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे चेतन सौंदळे या दोघांचे नामनिर्देशनपत्रे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते वाल्मीक कराड यांच्या शिफारशीने काल दि.9 जुन रोजी दाखल करण्यात आल्याने निवडीची औपचारिक घोषणा बाकी होती आज दुपारी 12 वा.झालेल्या विशेष सभेत सोनी व सौंद॓ळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
दरम्यान नवनिर्वाचित स्विकृत सदस्यांनी ना.धनंजय मुंडे ,नगराध्यक्ष आणी गटनेते वाल्मिक आण्णा कराड व नगरसेवकांचे आभार माणुन मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment