Wednesday, June 10, 2020

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाण च्या वतिने कोरोनाच्या लढाईत उत्कृष्ट काम करणा-या शासकीय अधिका-यांचा केला सन्मान


परळी दि. १० —– परळी तालुक्यातील कोरोना महामारीच्या लढाईत उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्य, महसूल व पोलिस यंत्रणा आणि वीज वितरण कंपनीतील अधिका-यांचा गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने कोविड संघर्ष योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव केला आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यालयात जाऊन अधिका-यांचा सन्मान केला.
कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात गंभीर आहे, परंतु बीड जिल्हयात इतर तालुक्याच्या तुलनेत परळी शहर व तालुक्यात मात्र परिस्थिती पुर्णपणे नियंत्रणात आहे, याचे सर्व श्रेय आरोग्य, महसूल व पोलिस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाते, त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच तालुक्यातील जनता आज सुरक्षित आहे. या लढाईत त्यांनी दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने त्यांचा कोविड संघर्ष योध्दा सन्मानपत्र देऊन काल गौरव केला.
तहसील कार्यालय येथे भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया , चंद्रकांत समशेट्टे, ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, वीज कंपनी कार्यालयात अरुण अर्धापुरे, विठ्ठलअप्पा चौधरी, पोलिस स्टेशन व नगर पालिका येथे भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, विकासराव डुबे यांनी सदर सन्मानपत्र देऊन गौरव केला. या सर्व ठिकाणी राजेंद्र ओझा, महादेव ईटके, अरुण पाठक, मोहन जोशी, अश्विन मोगरकर, प्रितेश तोतला, नितीन समशेट्टे, सचिन गित्ते, अनिश अग्रवाल, विकास हालगे, जितेंद्र मस्के आदींसह कार्यकर्ते उपस्थित हो

No comments:

Post a Comment