Thursday, February 5, 2026

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी कथित ऑडिओ क्लिप हायरल.


बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  या क्लिपमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला उघडपणे आव्हान देत म्हणते की, ‘मी स्वतः जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारतो. कधी घालायच्या ते तू सांग, माझी बातमी कुठे द्यायची तेही तू ठरव; पण मी त्यांना जीवेच मारतो. एवढेच नाही तर तुलाही गोळ्या घालतो. आता हे खरं होतंय की नाही, तेच तू बघ.’ ही कथित ऑडिओ क्लिप नेमकी कधीची आहे आणि त्यातील बोलणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

विशेष म्हणजे, या गंभीर धमकीबाबत अद्याप पोलिस दप्तरी कोणतीही अधिकृत नोंद झाली नाही. मात्र, बुधवारी ही क्लिप वाऱ्यासारखी पसरल्याने संताप व्यक्त होत आहे. ही क्लिप जुनी आहे की ताजी, याबाबत साशंकता असली तरी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

No comments:

Post a Comment