Wednesday, February 11, 2026

परळीतील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पोलिस बंदोबस्तात बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाल्या आहेत. परळी वैजनाथ शहरातील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू असल्याची प्रतिक्रिया केंद्रप्रमुख एस.आर.कापसे यांनी दिली. 
        नाथ शिक्षण संस्था संचलित, परळी वैजनाथ संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा शिक्षण विभागाच्या निर्दशाचे पालन करत परीक्षा सुरळीत सुरू आहेत. 
 परिक्षा केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त होता. तसेच यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या बारावीच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर येथे सुरळीत सुरू आहे. परीक्षा केंद्रावर कडक शिस्तीत बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षा पार पडत आहेत. परीक्षा केंद्रांवर भरारी पथक व बैठे पथक, सीसीटीव्ही निरीक्षण व सतत तपासणी व प्रशासनाची काटेकोर नजर ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा देता येत आहे.इयत्ता १२ वीच्या परीक्षेतील पहिला इंग्रजी विषयाचा  आज पेपर सुरळीत पार पडला या केंद्रावर २७८ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
             शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या असून, त्याचाच एक भाग म्हणून बारावीच्या पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपरची परीक्षा  यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयच्या परीक्षा शारदाविद्यामंदिर, बँक कॉलनी येथे इयत्ता बारावीच्या परीक्षा या केंद्रांवरील परीक्षा शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात पार पडली.

No comments:

Post a Comment