Saturday, February 7, 2026

भारत विद्यालय धाराशिवचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रेय(दत्तु)घुमरे सर सेवानिवृत्त झाल्याबद्दल कांतीकारी साथी व मगर परिवाराच्या वतीने सत्कार.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आमचे स्नेही भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. दत्तात्रेय (दत्तु)घुमरे सर प्रदिर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त झाल्या बद्दल कांतीकारी साथी व मगर परिवाराच्या सत्कार करण्यात आला. 
मा.श्री घुमरे सर यांचे व्यक्तित्व म्हणजे एक शिस्त प्रिय व विद्यार्थी प्रिय सर म्हणून सुपरिचित आहे. नौकरी च्या सुरुवातीच्या काळात वाशी जिल्हा धाराशिव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे अनेक वर्षे सेवा दिल्या नंतर त्यांची भारत विद्यालय धाराशिव येथे मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. 
अनुशासन डिसीप्लीन तत्त्वज्ञानी तत्ववादी असल्यामुळे विविध क्षेत्रात त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत त्यांच्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थीचे ते आदर्श आहेत.असे सर्व प्रिय भारत विद्यालय मुख्याध्यापक मा.श्री. दत्तात्रेय (दत्तु) घुमरे सर सेवानिवृत्त झाल्याबद्दल कांतीकारी साथीच्या मुख्यसंपादक सौ. वर्षा मगर संपादक श्री हनुमंत मगर व मगर परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला व निवृत्तीचा पुढील काळ सुखी निरोगी आरोग्यदायी जावो ह्या सदिच्छा देण्यात आल्या. 
यावेळी या सत्कार समारंभास कांतीकारी साथी चे मुख्यसंपादक सौ.वर्षा मगर संपादक श्री.हनुमंत मगर. गणेश मगर रवि मगर सौ.सारीका मगर पद्मिनी मगर आदीसह जय महाराष्ट्र महिला संघटना पदाधिकारी आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment