परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नागापूर येथील ग्रामदैवत श्री नागनाथ प्रभु यांच्या पावनभूमीत पुष्प 30 वा श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताह यास शुक्रवार दि. 27 रोजी श्री नागनाथ मंदिर, नागापूर येथे प्रारंभ होत आहे. या सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांच्या प्रवचन-कीर्तनांचा लाभ भाविकांना मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे शनिवार: ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज माजलगावकर, रविवार: ह.भ.प. भानुदास महाराज खरात, सोमवार: ह.भ.प. किशोर महाराज सूर्यवंशी, मंगळवार: ह.भ.प. पांडुरंग महाराज कोकाटे, बुधवार: ह.भ.प. माधव महाराज ढाकणे, गुरुवार (सकाळी 10 ते 12 वा.): ह.भ.प. बाळासाहेब महाराज कुलकर्णी दस्तापूरकर यांचे तुकाराम महाराज वैकुंठ गमन विषयावर गुलाल व पुष्पवृष्टीसह कीर्तन, गुरुवार (रात्री 8 ते 10 वा.): ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे कीर्तन, शुक्रवार दि. 6 (सकाळी 11 ते 1 वा.): ह.भ.प. जगन्नाथ महाराज देशमुख यांचे काल्याचे कीर्तन शुक्रवारच्या समारोप कार्यक्रमानंतर सर्व भाविकांसाठी सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त ग्रामस्थ मंडळी, नागापूर यांच्या वतीने भाविक भक्तांनी या श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सोहळा तसेच अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment