Saturday, September 21, 2024

लाईट फिटिंगचे काम करताना १९ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू.

बीड (प्रतिनिधी) शहरातील नाळवंडी नाका परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा शॉक लागून शुक्रवारी (दि.२०) रात्री ९ च्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. करण कोरडे वय-१९ वर्ष रा.नाळवंडी नाका, बीड. असे मृत तरुणाचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे कि, करण कोरडे हा तरुण लाईट फिटिंगचे काम करतो. शुक्रवारी रात्री तो धाराशिव जिह्यातील तेरखेडा या गावी लाईट फिटिंगच्या कामासाठी गावातील एका ग्रामस्थाच्या घरी गेला होता. या दरम्यान नकळत त्याला शॉक बसला. यावेळी तात्काळ त्याला धाराशिवच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शनिवारी दुपारी मोंढा रोडवर असलेल्या अमरधाम स्मशानभूमीत त्याचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment