Sunday, September 1, 2024

केज शहरामध्ये लवकरच होणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. नगरपंचायतीत झाला एकमुखी ठराव मंजूर

केज (प्रतिनिधी केज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नुतनीकरण, सुशोभीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा ठराव नगरपंचायतच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये मांडण्यात आला होता तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून पुढील कार्यवाही करीता जिल्हाधिकारी यांचेकडे तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. केज नगरपंचायतमधे घेतलेल्या या विशेष भूमिकेबद्दल मराठा मावळ्यांनी आनंद व्यक्त करत केजमधे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा सिताताई बनसोड आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार यांचा लवकरच सत्कार करण्याची तयारी केज तालुक्यातील मराठा बांधवांडून सुरू असल्याचे कळते.
केज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या मागणीचा आदर करत केज नगरपंचायतची सत्तासुत्रे सक्षमपणे सांभाळत असलेले जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारुणभाई इनामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नुतनीकरण सुशोभीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा प्रस्ताव नगरपंचायतच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीमध्ये ठेवला. हारुणभाई इनामदार आणि नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांच्या या भूमिकेला उपस्थित सर्वच नगरसेवकांनी सहमती दर्शवली आणि एकमुखाने हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नगराध्यक्षा सिताताई बनसोड व हारुणभाई इनामदार यांच्या या भूमिकेचे सकळ मराठा समाजाकडून स्वागत करण्यात येत आहे. या चौकाच्या नुतनीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू होईल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा देखील या ठिकाणी येणाऱ्या काळात होण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या विशेष कामाबद्दल मराठा समाजाकडून मराठा आरक्षण योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हस्ते लवकरच नगराध्यक्षा सिताताई बनसोड आणि जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment