बीड (प्रतिनिधी) : येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था बालरंगभूमी परिषद प्रत्येक जिल्हास्तरावर दिव्यांग महोत्सव घेणार आहे. ५ ऑक्टोबरला बीड दिव्यांग महोत्सवापासून याची सुरूवात होणार असल्याची माहिती बीड शाखेच्या अध्यक्ष तथा बालरंगभूमी परिषदेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी दिली आहे.
बालरंगभूमी परिषद आपल्या व्याप्तीनुसार मुलांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने कार्य करत असताना विशेष मुलांना सुध्दा व्यासपीठ उपलब्ध व्हावे. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव, प्रोत्साहन देवून त्यांना सक्षम मुलांच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘यहाँ के हम सिंकदर’ हा विशेष मुलांच्या कलागुण सादरीकरणाचा एक प्रयत्न आहे. शहरातील सौ.के.एस.के. महाविद्यालयाच्या परिसरात दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळपासून सुरू होणार्या महोत्सवात बीड जिल्ह्यातील जवळपास २५ दिव्यांग शाळांचा सहभाग असणार आहे. यात कर्णबधीर, मुकबधीर, अंध, मतिमंद, अस्थिव्यंग अशा अनुदानित, विनाअनुदानीत शाळांचा सहभाग घेता येणार आहे. अंदाजे २०० विद्यार्थी सहभागी होतील. विशेष मुलांच्या गुण कौशल्याचे कौतुक करणारा हा महोत्सव असून ही स्पर्धा नाही. यात नाटक, नक्कला, गाणे, नृत्य, रांगोळी, चित्र योगा, वाद्यवाजवणे, शिल्पकला यातील कोणतीही कला हे विशेष मुले करू शकतात. महोत्सवाच्या ठिकाणी या मुलांनी बनवलेल्या वस्तुचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवता येणार आहे. महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातून या महोत्सवाला सुरूवात होत असून जास्तीत जास्त संख्येने दिव्यांग शाळा, विद्यालये, संस्था, शिक्षक, विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष निलम शिर्के सामंत, उपाध्यक्ष डॉ.दीपा क्षाीरसागर, शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतिश लोटके, राजू तुलालवार, दिपक रेंगे, दिपाली शेळके, आसेफ अन्सारी यांच्यासह सर्व कार्यकारिणी मंडळ, यहा के हम सिकंदर दिव्यांग महोत्सव समितीचे धनंजय जोशी, नंदकिशोर जुवेकर, दिपाली शेळके, नागसेन पेंढारकर बीड शाखेचे डॉ.संजय पाटील देवळाणकर, स्नेहल पाठक, शाहीर विलास सोनवणे, अनुराधा चिंचोलकर, प्रा.दुष्यंता रामटेके आदींनी केले आहे.
नोंदणी, अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्कासाठी विजय राख 9833345809, दिपक जमधाडे 8888850358, नामदेव साळूंके 8308363335, सुरेश थोरात 9422911090, मिलींद शिवणीकर 9422930490, अमित गाडे 8888959792, प्रदिप भोकरे 9822599697, अक्षय फुलझळके 9637999629, सुरेश साळूंके 9823601480 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment