Saturday, September 28, 2024

शामा प्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावर अपघात एक ठार तर एक गंभीर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  परळी शहरातील रेल्वे उड्डाणपुला नजीक मोटार सायकल आणि कंटेनर अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दि 28 रोजी सायंकाळी घडली.या प्रकरणी बातमी लिखाण करेपर्यंत मयताचे नाव समजू शकले नाही.

मिळलेल्या प्राथमिक माहितीनुसार परळी शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर शनिवार दि 28 रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास मोटार सायकल आणि मालवाहू कंटेनर क्रमांक एम.एच 26 एच 6038 यांची समोरासमोर धडक मोटारसायकल वर असलेला व्यक्ती कंटेनर खाली आल्याने जागीच ठार झाला तर सोबत असलेला एक व्यक्ती गंभीर जखमी झाला.रात्री उशिरापर्यंत मयत व्यक्तीचे नाव समजू शकले नाही मात्र हा अपघात उड्डाण पुलावर असलेल्या खड्डे चुकवताना झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.

No comments:

Post a Comment