Sunday, September 1, 2024

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो !नदीकाठी राहणाऱ्या नागरिकाना प्रशासनाचे वतीने सतर्कतेचा इशारा.


बीड (प्रतिनिधी) आज सकाळपासून पडत असलेल्या पाऊसामुळे बिंदुसरा धरण ओसांडून वाहत असून शहरातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकाना प्रशासनाचे वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

मागील दोन दिवसापासून राज्यासह बीडजिल्ह्यात पावसाने जोर धरलेला पाहायला मिळत असताना आज सकाळच्या पावसाने बीडचे वैभव असलेले बिंदूसरा धरण ओसांडून वाहत आहे. तसेच शहरातील नाल्या तुडुंब पाण्याने भरलेल्या पाहायला मिळत आहेत. यामुळे शहरातील नदी काठी म्हणजेच चांदणी चौकातील तसेच दत्त मंदिर गल्लीत राहणाऱ्या रहिवास्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशीच परिस्तिथी रात्री पर्यंत राहिली तर कदाचित बीडमध्ये पूरजन्य परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे नदीकाठी राहणाऱ्या रहिवास्यांनी सतर्क राहावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment