परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बिचकुंदा (तेलंगणा)ते श्रीक्षेत्र कपिलधार पदयात्रा बुधवारी सायंकाळी परळी वैजनाथ नगरीत आली,या पदयात्रेचे शहरात भाविकांनी जोरदार स्वागत केले,या सोहळ्यात श्री सोमलींग शिवाचार्य महाराज बिचकुंदा हे भविकासह सहभागी झाले,
वैद्यनाथ मंदिर समोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, भजनांदात व रिंगण सोहळ्यात श्री सोमलींग शिवाचार्य महाराज बिचकुंदा हे सहभागी झाले,नरेश साखरे व सौ साखरे यांनी त्यांची पूजा केली ,शिवाचार्य महाराजा सह भक्त हर हर महादेव ,श्री मन्मथ स्वामी की जय अश्या घोषणा देत वैजनाथ मंदिरात पोहोचले व प्रभू वैद्यनाथाचे त्यांनी दर्शन घेतले .पदयात्रेत प्रत्येकाच्या गळ्यात भगवा रुमाल व झेंडा होता, गुरुवारी येथील वक्रेश्वर मंदिरात पदयात्रेतील भाविकांनी परमरस्य पारायणाचे वाचन केले
या कार्यक्रमास सोमलिंग शिवाचार्य महाराजांनी व श्री वसमतकर महाराजांनी भेट दिली,यावेळी आरती ,पूजा,झाली.
No comments:
Post a Comment