Monday, April 11, 2022

रमेश नेहरकरच्या खुन्याला अटक करा म्हणून प्रेत पोलीस ठाण्यात. मारेकरी अटक केल्या शिवाय अंत्यसंस्कार करणार नाही नातेवाईक ठाम.


*सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हजर.

केज (प्रतिनीधी ) :- रमेश नेहरकरच्या खुण्याला अटक करा म्हणून त्याच्या नातेवाईकांनी प्रेत केज पोलीस ठाण्यात आणले असून सुमारे २०० लोकांचा जमाव केज पोलीस ठाण्यात जमला आहे. पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे परिस्थिवर लक्ष ठेवून असून ते जमावशी चर्चा करीत आहेत.


दरम्यान माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पोलीस ठाण्यात आले असून ते मयताचे नातेवाईक व पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment