पुणे – सध्या कोरोना या महामारीचे सरकारने सर्व निर्बंध हटविल्यानंतर आता विविध प्रकारच्या कंपन्यांनी कर्मचारी भरती मोठ्या प्रमाणावर सुरू केली आहे परंतु कोरोना काळात झालेल्या ऑनलाइन परीक्षा व त्यातून मिळालेल्या गुणांवर कंपन्यांना भरोसा वाटत नाही म्हणून त्यांनी मात्र विद्यापीठातर्फे घेण्यात स्वतःच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी सुरू केली आहे.
कोरोना मुळे विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या यामध्ये विद्यार्थी पास सुद्धा झाले परंतु त्यांचा हा आनंद फार काळ टिकून राहिला नाही. विद्यार्थ्यांना पुन्हा आशा पद्धतीने परीक्षेला सामोरन जावं लागत आहे. मिळालेले गुण यावर कंपन्या भरवसा ठेवत नसल्याने आता कंपन्या स्वत:च परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची पात्रता तपासत आहे. कंपन्या भरतीवेळी आशा पद्धतीने परीक्षा घेऊ लागल्याने इतरही ठिकाणी असेच झाले तर तेव्हा पास झाल्याचा काय फायदा असा प्रश्न निर्माण होईल.
No comments:
Post a Comment