Monday, April 11, 2022

पैशासाठी सहा महिन्यात सहा वेळा लग्न करणारी नवरी पोलीसांच्या जाळ्यात.


औरंगाबाद (प्रतिनीधी): खुलताबाद येथील एका तरुणाचे लग्न झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूने दागिन्यांसह एका कारमधून धूम ठोकल्याची घटना समोर आली होती. या नववधूला औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलिसांनी अटक केली आहे. शुभांगी शिंदे असे अटक केलेल्या नवरी मुलीचे नाव आहे. सहा महिन्यात सहा वेळा लग्न करून चालु होती फसवाफसवी.

या फसवाफसवी करणाऱ्या मुलीला काल दुसऱ्याचं एका मुलांसोबत लग्न लावताना अंमळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खुलताबाद तालुक्यातील राजेश लाटे याचा जळगाव येथील शुभांगी शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. बबन म्हस्के जळगाव व आशाबाई भोरे (मुलीची मावशी) अंजनगाव सुर्जी यांच्या मध्यस्थीतून हा सोहळा झाला होता. नवरदेवांकडील नातेवाइकांनी मुलीकडील मंडळींना १ लाख ३० हजार रोख व ७० हजारांचे सोने नवरीच्या अंगावर घातले होते.
२९ मार्च नवरदेव राजेश व नववधू शुभांगी हे दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी गेले. तेव्हा नवरदेव राजेश यास चकमा देऊन शुभांगी फरार झाली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसात नववधू शुभांगी शिंदे सह सात जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जळगाव शहरातील दोन महिला हे रॅकेट चालवतात. या दोघींनी स्वतःच्याच भाचीचे सहा महिन्यांत सहा वेळा लग्न लावले. अमळनेर येथे त्यांचे बिंग फुटले अन् मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. हे रॅकेट चालवणारी टोळी मात्र फरार आहे. लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलांकडून पैसे सोने घेऊन फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे फसवणूक केली जात आहे.

No comments:

Post a Comment