Friday, November 5, 2021

क्षीरसागर यांच्या ईट येथील गजानन सहकारी सुतगिरणीला भीषण आग !


ईटच्या सुतगिरणीला भीषण आग !

बीड – तालुक्यातील इट येथे असलेल्या गजानन सहकारी सूत गिरणीला पहाटे भीषण आग लागली.यामध्ये लाखो रुपयांचे सूत आणि मशनरी चे नुकसान झाले आहे.पाच सहा तासानंतर देखील आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून इट येथे गजानन सहकारी सूत गिरणी उभारण्यात आली .भारतासह विदेशात देखील येथील सूत निर्यात केले जात होते .शेकडो स्थानिक कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत होता .

शुक्रवारी पहाटे या सुतगिरणीला अचानक भीषण आग लागली.यामध्ये लाखो रुपयांचे सूत आणि मशनरी चे नुकसान झाले आहे.परळी आणि बीड येथील अग्निशमन दलाचे अनेक बंब या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरू आहे.

No comments:

Post a Comment