Tuesday, November 2, 2021

परळी ग्रामीण पोलिस ठाण्याकडे जाणारा रस्ता उखडल्याने जीवघेणी कसरत.


परळी वैजनाथ  (जगदीश शिंदे) :     परळी ग्रामीण पोलिस ठाण्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था असून या रस्त्यामुळे ग्रामीण पोलिस ठाण्याचे चार कर्मचारी अक्षरश: जखमी झाले आहेत. सुमारे 82 गावांचा कारभार या ग्रामीण पोलिस ठाण्यावर (82 villages are under the control of this rural police station) चालतो. रस्त्यावरून दुचाकी चारचाकी तर सोडाच, परंतु पादचाऱ्यांना ही चालणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. या रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता,  अशी बकाल अवस्था या रस्त्याची झाली आहे. याकडे संबंधितांनी ताबडतोब लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ग्रामीण पोलिस ठाण्याकडे जाणारा रस्ता उखडल्यामुळे दुचाकी पंक्चर होते तर चारचाकी कधी उलथून पडेल, याची शाश्वती नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक पोलिस कर्मचारी दुचाकीवरून पडले आहेत. तक्रारदार एकदा तक्रार दिली की, पुन्हा पोलिस  ठाण्यामध्ये येण्यासाठी धजावत नाहीत.  त्यामुळे रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे अनेकांची  गैरसोय होत आहे. तसेच, पोलिस कर्मचाऱ्यांना सुध्दा ये-जा करावी लागत असल्याने नाकीनऊ आले आहेत. ग्रामीण पोलिस  ठाण्याची कारवाई ( Action of rural police station )जोरदार सुरू आहे. मात्र, पोलिस ठाण्याकडे जाण्यासाठी पोलिसांसह नागरिकांना जीव मुठीत धरून (Holding civilians with the police) जावे लागते. त्यामुळे या रस्त्याचे काम  करण्याची मागणी ग्रामीण पोलिस कर्मचारी आणि नागरिकांनी केली आहे.

परळी ग्रामीण पोलिस ठाण्याला जाण्याच्या रस्त्याची दुरवस्था(Road condition leading to Parli rural police station)  झाली असल्यामुळे त्या रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी पोलिस कर्मचारी महिला पोलिस पोलिस ठाण्याला येत जात असताना गाड्या घसरून  दोन तीन कर्मचाऱ्यांचे  हात – पाय फँक्चर झाले आहेत. तसेच, पोलिस ठाण्याच्या शासकीय वाहनाचे बोनट तुटले आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर, एखाद्याचा जीवही गमवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  कर्मचाऱ्यांसह , नागरिकांसाठीही हा रस्ता धोक्याची घंटा बनला आहे.

No comments:

Post a Comment