Tuesday, November 2, 2021

नीट परिक्षेत यश श्रीकांत ढेेले याचे सुयश ! 720 पैकी 650 गुण घेवुन देशात ओबीसी प्रवर्गातून 1310 रँकनी उत्तीर्ण.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1300 रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले असून तिच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
     परळी येथील माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व नगराध्यक्षा सौ.सरोजीताई हालगे यांचा नातू चि.यश श्रीकांत ढेले याने माहे सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नीट परिक्षेत परळी येथील चि.यश श्रीकांत ढेले याने 720 पैकी 650 गुण घेत ओबीसी प्रवर्गातून देशात 1310  तर ओपनमधून 4010 वा रँक घेवुन उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादित केले आहे. चि.यश याचे माध्यमिक शिक्षण केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे तर इयत्ता 11 वी व 12 वी चे शिक्षण लातूर येथील राजर्षी शाहु महाविद्यालय येथे पूर्ण झाले आहे. आई वडीलांचे स्वप्न पुर्ण करत नीट परिक्षेत 720 पैकी 650 गुण घेवुन देशात 4010  तर ओबीसी प्रवर्गातून 1310 वा रँक घेवुन उत्तीर्ण होत डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. चि.यश श्रीकांत ढेेले याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment