नाशिक :- (प्रतिनिधी) सामाजिक विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था येवला इकरा अरबी मदरसा स्कुल येवला यांच्या वतीने येवले शहरातील विंचूर चौफुली येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य अर्जुन कोकाटे, प्राचार्य बी व्ही गमे, विकी भैया बिवाल, विशाल सोनार,महेंद्र पगारे,जनसेवक डॉ.शेरुभाई सादिकभाई मोमीन, अजहर शाह ,अश्विनी जगदाळे शबिस्ता पिंजारी, नुसरत शेख, असद अन्सारी आदी उपस्थित होते प्राचार्य अर्जुन कोकाटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले मदरशांमध्ये भारतीय संविधान दिन साजरा होतोय आणि विद्यार्थी त्याला उत्तम असा प्रतिसाद देत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे मनोगत प्राचार्य अर्जुन कोकाटे यांनी व्यक्त केले. समाजसेवक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष विकी भैया बिवाल विशाल सोनार. शेरूभाई मोमीन यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पोहार चे वाटप केले व मदरसा शाळेचे त्यांनी कौतुक केले. इकरा शाह, सारा शेख, रूमेजा मोमीन, या विद्यार्थिनींनी संविधान उद्देशिकेचे यावेळी वाचन केले व कार्यक्रमाची सांगता केली प्रास्ताविक शेरूभाई मोमीन यांनी केले व आभार अझहर शाह यांनी मानले यावेळी विविध मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
No comments:
Post a Comment