
बीड - (प्रतिनीधी) हिंगोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अरीबम राधाविनोद शर्मा हे बीडचे नवे जिल्हाधिकारी असतील.विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या बदलीचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे .
2007 साली कॉम्प्युटर सायन्स मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट रांची येथून पदवी घेतल्यानंतर राधाविनोद यांनी 2008 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली,मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आल्यावर त्यांनी 2010 पर्यंत खाजगी कंपनीत नोकरी केली .त्यानंतर 2012 साली मणिपूर राज्यातून ते 128 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले .
बीडचे विद्यमान जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यावर पंचायत समिती भ्रष्टाचार प्रकरणी दिरंगाई केल्याप्रकरणी न्यायालयाने ठपका ठेवत बदली करण्याचे आदेश दिल्यानंतर शासनाने शर्मा यांची नियुक्ती केली आहे .
No comments:
Post a Comment