परळी वैजनाथ( प्रतिनिधी) प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत आर्ट अॉफ लिव्हींगचे संस्थापक गुरूदेव श्री.श्री.रवीशंकरजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मराठवाडयातील पहीले भव्य ज्ञानमंदीर उभारण्यात येणार आहे सदरील ज्ञानमंदीर बांधकाम उभारणीस राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज तपोनुष्ठान समिती,परळी-वैजनाथच्यावतीने एकेवीस हजार रूपयाची देणगी चेकद्वारे बीड जिल्हयाचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व विशेष सहाय्यमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,सचिव संतोष पंचाक्षरी सर्व पदाधिकारी व सदस्यांच्यावतीने आर्ट अॉफ लिव्हींगकडे सुपूर्द करण्यात आली.
*ज्ञान तपस्वी वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी द्वादश ज्योतीर्लिंग क्षेत्र प्रभू वैद्यनाथ मंदीर समोरील जागेत 82 वे श्रावणमास तपोनुष्ठान केले होते सदरील जागेच्या पाठीमागेच आर्ट अॉफ लिव्हींगच्या जागेत ज्ञानमंदीराची उभारणी केली जाणार आहे.
*समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी महाराजांनी श्रावणमासातील 21 दिवसाचे 84 मौन तपोनुष्ठान केले आहेत.विज्ञान आणि अध्यात्म याची योग्य सांगड घालून त्याचा विश्व कल्याणासाठी अखंड प्रसार आणि प्रचार केला.
जागतिक पातळीवर लाखो युवकांमध्ये नेतृत्वगुण,व्यक्तिमत्तव *विकास,सकारात्मकता,*ताण-तणाव व व्यसनमुक्ती तसेच आत्मबल निर्माण करण्यासाठी प्राणायाम,ध्यानशिबीरे व ज्ञानसत्रे आयोजित करण्यासाठी गुरूदेव श्री.श्री. रवीशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट अॉफ लिव्हींग परीवाराच्यावतीने ज्ञानमंदीराची उभारणी केली जात आहे.
*शिवैक्य राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे उत्तराधिकारी ष.ब्र.राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराजांकडून अशाप्रकाच्या उपक्रमास चालना देण्यात येत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपोनुष्ठान समितीच्यावतीने ज्ञानमंदीरास देणगी देण्यात आली आहे.
*याकरिता राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष नगरसेवक चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष शाहूराव ढोबळे,उपाध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर,रमेशअप्पा सपाटे,वैजनाथ बागवाले,महेश निर्मळे,गिरीष बेंबळगे,सचिव संतोष पंचाक्षरी,सोमनाथ निलंगे,मकरंद नरवणे,नंदकुमार खानापुरे,सदानंद चौधरी,दत्ताअप्पा चिल्लरगे,जगदीश मिटकर,दयानंद चौधरी,अशोक नावंदे,अरविंद चौधरी,सचिन काटकर,संजय खाकरे,ओमप्रकाश बुरांडे,सोमनाथ गोपनपाळे,चंदूअप्पा हालगे,बबन शेटे,रवी मिसाळ,प्रा.अमर आलदे,दिलीप झुंजे,अॅड.गिरीष नरवणे,राजाभाऊ हलकंचे,शिरीष सलगरे,मन्मथ नरवणे,अनिल चौधरी,नरेश साखरे,रमेश काळे,बाबासाहेब शिगे,नागेश अलबिदे,शिवशंकर नाईक,शरद घनचेकर,संतोष चौधरी,योगीराज बर्दापुरे,प्रकाश खोत,गजानन हालगे,मनोज बेबळगे,जयप्रकाश स्वामी,रत्नेश बेलुरे,निरंजन गौरशेटे,कैलास रिकीबे,पिंटू चौधरी,अमोल घेवारे,संदीप चौधरी,बालाजी चीडबुके,हनुमंतअप्पा घेवारे,दीपक कापसे,अतुल खके,चंद्रकांत अंदुरे,अनिल मिसाळ,श्रीकांत खोत यांच्यासह सर्व समाज बांधव,पदाधिकारी व सदस्यांनी योगदान दिले आहे.
No comments:
Post a Comment