Thursday, August 19, 2021

आज पत्रकारांसाठी राजयोगाद्वारे सुखशांती शिबिराचे आयोजन.- वैभव स्वामी


बीड (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या कार्यकाळात मानसिक, शारीरिक आणि आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात सर्वच क्षेत्रात झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती हा न खचता पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी सज्ज झाला पाहिजे, या हेतूने कार्यरत असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थानच्या वतीने राजयोगाद्वारे सुखशांतीची अनुभूती दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे,प्रदेश संघटक संजय भोकरे साहेब, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे आणि मार्गदर्शक संतोष मानूरकर यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा विभागाच्या पुढाकारातून तमाम बीड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचे औचित्य साधून राजयोगाद्वारे सुख शांतीची अनुभूती देणारे शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त पत्रकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, संस्था, देश, जग त्रस्त झाले आहे. सर्व काही असूनही तो सुख-शांती पासून दूर होत आहे.प्रकृतीचा हा कोप दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले आत्म मनोबल, ह्युमॅनिटी पावर वाढवण्यासाठी राजयोगाद्वारे मेडिटेशन अतिशय उपयुक्त ठरले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थानच्यावतीने संपूर्ण जगभरात राजयोगाद्वारे सुख शांतीची अनुभूती यशस्वी ठरली असून अनेकांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे.पत्रकार संघाच्या पुढाकारातून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, आदर्श नगर, डीपी रोड, बीड. येथे उद्या शुक्रवार दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान अवघ्या एक तासाचे सेशन आयोजित केले आहे. यानंतर प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थांच्या वतीने पत्रकारांसाठी खास रक्षाबंधनाचा कार्यक्रम होणार आहे.जॉईन होणार्‍या शिबिरार्थीने मास्क घालने बंधनकारक आहे.कोवीडचे सर्व नियम निकष पाळून सदरील शिबिर होणार आहे. राजयोगाद्वारे मेडिटेशन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरा नंतर शरीरातील ह्युमॅनिटी पावर तसेच आत्म मनोबल निश्चितपणे वाढून आत्मिक सुख शांतीचा मार्ग सापडेल,असा विश्वास या शिबिराच्या संयोजिका बालब्रह्मचारी प्रज्ञा दीदी यांनी व्यक्त केला आहे.यामुळे बीड जिल्ह्यातील तमाम प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियातील पत्रकार बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव विवेक स्वामी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment