परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बळीराजाचा आवडता उत्सव पोळा काही दिवसांवर आला असून संगमच्या सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी जेसीबी लावून मारोती मंदिरानजीकचा पोळा मिरवणूकीचा मार्ग स्वच्छ केला असून आता येथे सहजपणे बैलांची मिरवणूक काढता येणार आहे.
संगम ता.परळी वैजनाथ येथील सरपंच सौ.वत्सलाबाई कोकाटे यांनी बळीराजाचा उत्सव बैलपोळा लक्षात घेवून बैलांची मिरवणूक ज्या मंदिर परिसरात निघते तो परिसर आणि मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग यंत्र सामुग्री लावून सुरळीत केला आहे. मंदिराच्या अवती भोवती असलेला कचरा, लहान मोठे दगड गोठे तसेच इतर साहित्य पूर्णपणे स्वच्छ केले आहे.
*बळीराजाची सेवा करता आली*
बैलपोळयाला गावातील मंदिराला बळीराजा बैलाची या मार्गावरून मिरवणूक काढतो . मंदिर परिसरात बैलांची पुजाही होते. शेतकरी राजा बैलांचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करीत असून त्यांना व त्यांच्या बैलजोड्यांना मिरवणूक, प्रदक्षिणा मार्ग स्वच्छ, सुरळीत व सुरक्षित असावा या दृष्टीकोनातून आपण हा मार्ग स्वच्छ केल्याचे व बळीराजा तसेच बैलाची सेवा करता आली हे मी माझे भाग्य समजते.असे
सौ.वत्सलाबाई कोकाटे
सरपंच, मौजे संगम ह्या म्हणाल्या
No comments:
Post a Comment