Tuesday, October 6, 2020

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीन संच पुन्हा होणार सुरू.


परळी वैजनाथ - : दाऊतपूर येथील नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेचे तीन संच मंगळवार पासून पुन्हा कार्यान्वित होणार असल्याचे विद्युत केंद्राच्या सूत्रांनी सांगितले काही दिवसां पूर्वी बंद ठेवलेल्या येथील एकूण 750 मेगावॅट क्षमतेच्या तीन संचातून वीज निर्मिती 25 दिवसानंतर सुरू होत आहे .संच सुरू करण्याच्या दृष्टीने सोमवारी विद्युत केंद्राच्या प्रशासनाने तयारी सुरू केली. आता विजेची मागणी वाढू लागल्याने हे तीन संच मंगळवारपासून पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे . या संदर्भात परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता नवनाथ शिंदे यांनी परळी चे तीन ही संच मंगळवार पासून कार्यान्वित होतील असे सांगितले

No comments:

Post a Comment