Thursday, October 8, 2020

बीड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी---ज्ञानेश्वर कवटेकर


 बीड (प्रतिनिधी) दि.08 मागील पंधरा दिवसा पासून महाराष्ट्रा सहीत बीड जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सतत पाऊस झाला यामुळे सोयाबिन पिक पिवळे पडले शेतकऱ्यांचे यामुळे उत्पादन घटणार आहे अशी भिती शेतकऱ्यांन्या आहे त्याच बरोबर कापूस,मुग,बाजरी,उडीद ,तिळ या पिकांचे पण अतोनात नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांची सरसकट मदत द्यावी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते ज्ञानेश्वर कवठेकर यांनी मागणी केली आहे.
 अगोदरच शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या सामना करत आहे त्यातच कोरोना माहामारी च्या विळख्यात शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी झाली व कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना आपला शेती माल विकावा लागला त्यातून शेतकरी बाहेर निघतो का नाही परत आतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पाऊसाने हिरावून घेतला आहे तरी शासनाने बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये मदत करावी तरी राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना या आसमानी व सुलतानी संकटातून बाहेर काढून शेतकऱ्यांन्या सरसकट मदत करावी असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे ज्ञानेश्वर कवठेकर यांनी दिले आहे.

No comments:

Post a Comment