Thursday, October 22, 2020

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह .

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. अजित पवारांना गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. अजित पवारांनी स्वत:ला घरीच क्वारंटाईन करून घेतले आहे. याबाबतचे वृत्त  ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी दिले आहे.
अजित पवार यांनी नेटकिच नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. यादरम्यान अजित पवार यांना कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैद्यकीय चाचणी केली होती. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
 राज्यात अतिवृष्टीमुळं प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याचे समजते.

No comments:

Post a Comment