बीड :- (प्रतिनीधी )
राज्यात राज्य शासनाने 13 मार्च 2020 पासुन कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 लागु केला आहे . त्याप्रमाणे मा . जिल्हाधिकारी , बीड यांनी या कायदयातील तरतुर्दीच्या अंमलबजावणी करीता आदेश जारी केले आहेत . मा . पोलीस अधिक्षक श्री हर्ष ए . पोद्दार सो यांनी पोनि स्थागुशा बीड यांना बीड जिल्हयामधील अवैध धंदयांची माहीती काढुन दर्जेदार केसेस करुन अवैध धंदयांचे उच्चाटन करण्याच्या सुचना दिल्या आहेत . आज दिनांक 02/06/2020 रोजी 12.00 वा च्या सुमारास सपोनि आनंद कांगुणे व पोलीस कर्मचारी हे बीड ग्रामीण पोलीस ठाणे हददीत नामलगाव फाटा परिसरात अवैध धंदयांवर कारवाई करणेकामी गस्त करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , नामलगाव फाटा येथे कुमशी रोड येथील निखील पार्क जवळ मोकळया जागेत विनापरवाना बेकायदेशीररीत्या वाळुचा साठा करुन ठेवलेला असुन सदर ठिकाणी एक हायवा टिपरमध्ये जेसीबी मशीनच्या सहाय्याने विनापरवाना वाळु भरण्याचे काम चालु आहे . नमुद बातमी मिळताच बातमीच्या ठिकाणी सपोनि कांगुणे व पोलीस कर्मचारी यांनी अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी एक भारतबेंझ कंपनीचा हायवा टिपर क्रमांक एम एच 12 एचडी 6997 हा वाळुने भरलेला मिळुन आला व तेथे एक पिवळया रंगाचे जेसीबी मशीन क्रमांक एम एच 23 एएस 7493 हे मिळुन आले . नमुद हायवा टिपर चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव समीर बाबुलाल शेख , वय 28 वर्षे , रा , आहेर वाहेगाव , ता . गेवराई , जि . बीड व जेसीबी चालकाने त्याचे नाव राहुल शिवाजी चांदणे , वय 25 वर्षे , रा . घोसापुरी , ता . जि . बीड असे सांगितले . नमुद हायवा टिप्पर चालकास व जेसीबी चालकास त्यांच्याकडे वाळु वाहतुक करण्याचा शासनाचा परवाना व कर भरल्याची पावतीबाबात विचारणा केली असता त्यांच्याकडे वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगुन ते वाळुची चोरटी वाहतुक करत असल्याचे त्यांनी सांगितल्याने नमुद हायवा चालक व जेसीबी चालक यांच्या विरुध्द बीड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं 184/2020 , कलम 379,269,270,188,34 भादवि सह कलम 51 ( ब ) आपत्ती व्यवस्थापन कायदा सह कलम 17 मपोका अन्वये गुन्हा नोंद करुन 20 लाख रु किंमतीचा भारत बेंझ हायवा टिप्पर क्रमांक एम एम 12 एचडी 6997 व त्यामध्ये किं.रु. 35,000 / - ची अंदाजे 5 ब्रास वाळु व 20 लाख रु किंमतीचा जेसीबी क्रमांक एम एच 23 एएस 7493 असा एकुण 40 लाख 35 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे . तसेच नमुद हायवा मधील वाळुची तपासणीकामी मा.जिल्हाधिकारी , बीड यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस अधीक्षक , बीड , श्री . हर्ष ए . पोद्दार , मा.अपर पोलीस अधीक्षक , बीड , श्री . विजय कबाडे , पो.नि.श्री . भारत राऊत स्थागुशा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी , सपोनि आनंद कांगुणे , पोना झुंबर गर्जे , पोना सखाराम पवार , पोकों गोविंद काळे , चालक पोना गहिनीनाथ गर्जे यांनी केलेली आहे .
No comments:
Post a Comment