Tuesday, June 9, 2020

महाराष्ट्रातील वकील बांधवांना पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण द्या--मुख्यमंत्र्यांना मागणी.

लातुर ;- प्रतिनीधी  दि.९. रोजी महाराष्ट्रातील वकील बांधवांना पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण द्या अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना उद्धवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
कोरोना-१९ च्या महामारीमुळे शेतकरी, मजूर, छोटे मोठे व्यापारी, ऑटोवाला, भाजीपाला,फळवाला ,ठेलेवाला अशा अनेक व्यवहारावरच नव्हे तर न्यायालयीन कामकाजावर ही यांचा परिणाम झाल्याने मागील अडीच महिन्यापासून कामकाज बंद होते, ते दिनांक ८ जून रोजी पासून सुरु करण्यात आले आहे. न्यायालयीन सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने विमा संरक्षण दिलेले आहे,अपवाद फक्त वकील वर्ग आहे. वकील वर्गाच्या उपस्थिती शिवाय न्यायालयीन कामकाज चालणे अशक्य आहे. एकीकडे वकिलांना कोर्ट ऑफिसर संबोधायचे आणि दुसरीकडे त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था करावयाची नाही. हे अत्यंत चुकीचे आहे, वकील वर्गाचा विचार कोणीही आणि कोणत्याही स्तरांवर केलेला दिसून येत नाही. वकिलांना ही कुटूंब आहे न्यायालयासाठी व पक्षकारांसाठी जीवावर उदार होऊन, तो ही कोर्टात येतो आहे तो दररोज अनेक पक्षकारांना भेटतो, कोणता पक्षकार कोठून आलेला आहे, तो कॉन्टेनमेंट झोन मधील आहे का नाही ? यांचीही त्यास कल्पना नसते, दररोज अनेक कागदपत्रे वकिलांनकडुन कुठल्याही सुविधे शिवाय हाताळले जातात. अशा अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत तोही, न्यायालयासाठी काम करीत आहे, त्यामुळे मानवतावादी दृष्टीकोनातून महाराष्ट्रातील सर्व वकील बांधवांना पन्नास लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात यावे अन्यथा पुढील पंधरा दिवसात विमा संरक्षण दिल्याशिवाय वकील वर्ग कोरोनाच्या भीतीपोटी कोर्टात येणार नाही. कदाचीत हा वकील वर्गाकडून असहकार आंदोलनाचा प्रकार असु शकतो त्यामुळे सदर बाबीवर तात्काळ निर्णय घेऊन विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे
निवेदनावर अड बालाजी सिंगापुरे रेड्डी, अड सचिन बावगे, अड नरेंद्र नवरकेले,अड प्रदीपसिंह गंगणे, अड श्रीकांत मोमले, अड अभिजीत मगर, अड राहुल क्षिरसागर, अड अश्विन जाधव, अड कैलास मस्के, अड अश्विन जाधव,अड सलीम डावकरे,अड मनोज जाधव, अड रवी अडसूळ, अड प्रणव रायचुरकर, अड धनंजय भिसे, अड बालाजी शिंदे, अड श्रीकांत बोराडे पाटील, अड चंद्रकांत मेटे,अड सूर्यबहादूर पाटील,अड शिवकुमार क्षिरसागर,अड सुभाष माने आदींच्या स्वाक्षऱ्या असून राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक मंत्री व लातुर जिल्हयांचे पालकमंत्री ना अमित विलासराव देशमुख, याना विधिज्ञ बांधवाचीं बाजु मुख्यमंत्र्यानकडे लावुंन धरन्याची विनती करण्यात आली आहे
महाराष्ट्र व गोवा वकील परिषदेचे अध्यक्ष, सदस्य अड अण्णाराव पाटील, लातुर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अड चंद्रकांत आगरकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती अड सचिन बावगे यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment