Tuesday, June 9, 2020

लाचलुचपत विभागाची कारवाई लाचखोर तलाठी रंगेहाथ जाळ्यात.


गेवराई प्रतिनिधी -:जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी करणारा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. गेवराई शहरातील ताकडगाव रोडवरील रुची भोजनालयात सोमवारी दि. 8 रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. दादासाहेब सुखदेव आंधळे वय 34 असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. त्याने तक्रारदारास जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. 220 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले या प्रकरणी कैलास नारायणराव ढोले यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाणे मध्ये मंगळवारी दि. 9 रोजी पहाटे गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment