Monday, June 1, 2020

गेवराई तालुक्यातील मण्यारवाडी शिवारात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने परिसरात खळबळ.


गेवराई ;- (प्रतिनीधी) गेवराई तालुक्यातील मण्यारवाडी शिवारात नुकतेच जन्मलेले अर्भक आढळून आल्याची घटना सकाळी १० वा च्या सुमारास उघडकीस अली मण्यारवाडी शिवारात सकाळी एका अज्ञात महिलेने प्रसूती नंतर स्त्री अर्भकाला जन्म देऊन रस्त्याच्या कडेच्या शेतात टाकून दिले. दरम्यान शेतात जाणाऱ्या जनाबाई काळे यांना नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला असता त्या महिलेने आसपास शोध घेतला असता नुकतेच जन्मलेले अर्भक आढळून आले.
सादर महिलेने मण्यारवाडीचे सरपंच शिवाजी डिंगरे यांना कळवले असता सरपंच व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व हे अर्भक गेवराई येथे जनाबाई काळे यांनी उपचारासाठी दाखल केले . तसेच या अर्भकाला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनास्थळी पो नि पुरुषोत्तम चोबे पोलीस नाईक गणेश तळेकर,ग्रामसेवक सलमा शेख,यांनी घटनाष्टालाच पंचनामा करून पो नि जीवराज टाकसाळ हे अधिक तपस करत आहेत. या प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

No comments:

Post a Comment