परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 3/10/2026 रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे सर व यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय परळी येथे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या वतीने राबवित असलेले रेड रिबीन क्लब च्या विद्यार्थ्यांनी उपजिल्हा रुग्णालय परळी येथे भेट देऊन रुग्णालयातील ओपीडी, अपघात विभाग, ऑपरेशन थेटर एक्स-रे, प्रयोगशाळा विभाग, प्रस्तुती कक्ष व आयसीटीसी या विभागाची समुपदेशक श्री शरद चव्हाण यांनी संपूर्ण माहिती दिली त्यात विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दल मार्गदर्शन करताना एच आय व्ही/ एड्स होण्यामागची कारणे त्याची लक्षणे व त्यावर उपलब्ध असणारा औषध उपचार , टीबी, , गुप्तरोग, मलेरिया, कॅन्सर या विविध आजाराबद्दल माहिती दिली, पोस्टर प्रदर्शनातूनही माहिती देण्यात आली व एच आय व्ही तपासणी करण्याच्या प्रक्रिया त्याच्या किट संदर्भात सविस्तर माहिती दिली एच आय व्ही वर उपलब्ध असणाऱ्या औषधोपचाराबद्दल ही माहिती देण्यात आली आयसीटीसी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रेड रिबीन क्लब मार्फत विद्यार्थ्यांकडून आरोग्याची जनजागृती करावी असे आवाहन केले. तसेच एचआयव्ही विषयी शंका आहे का करिता सेल्फ रिस्क असेसमेंट चे किंव आर कोड विद्यार्थ्याकडून स्कॅन करून घेण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ अरुण गुट्टे सर, , मेट्रन यमुना गायकवाड व कर्मचारी वृंद. तसेच यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे सर, रेड रिबीन क्लब कार्यक्रम अधिकारी प्रा. पी.पी.तिडके मॅडम, प्रा. ए.डी. शेख, प्रा. एस.के.अप्पार मॅडम यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment