परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचे सहावे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल प्रणांगणामध्ये दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी संपन्न झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गीतावर नृत्य सादर करून आगळे वेगळे कलाविष्कार सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीतामुळे प्रेक्षक अक्षरक्षा भारावुन गेले होते.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शाळेचे मार्गदर्शक श्री. किरण गित्ते साहेब, IAS, सचिव त्रिपुरा सरकार आणि विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ. उषाताई किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली चि. शौर्य किरण गित्ते यांनी केले. उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर साहेब, ‘मी होनार सुपरस्टार’ नृत्य कोरिओग्राफर साक्षी मेथे, मुख्याध्यापक डॉ. श्रीकांत पाटील सर, पोतदार जमबो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहा गित्ते आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी श्री.शौर्य किरण गित्ते, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. पोतदार जमबो किड्स विद्यार्थी विद्यार्थीनींनी व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले.
शाळेतील चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पोतदार जमबो किड्सच्या विद्यार्थी- विद्यार्थीनीं भुलभुलया, आज है संडे, रिटरो, ना ना ना रे तोबा तोबा, पुष्पा 2, गाण्यावर नृत्य सादर केले. दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालीसा वर आधारित गाण्याने सुरूवात केली.कोळीगीत, याच बरोबर पाचवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे सादरीकरण केले. साक्षी मेथे यांनी
सामी सामी, कमली,मदन, मंजिरी, कुरूची मर्दा बीटी या हिंदी व मराठी गाण्यांच्या मेषप वर नृत्य सादर केले व प्रेक्षकांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज आधारित, भक्तिगित, लोकगित, हिन्दी गीत , आदिवासी गीत , पारंपारिक वेशभूषा नृत्य आविष्कार सादर केला. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे तसेच पोतदार जमबो किड्स शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थी - विद्यार्थीनी पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment