बीड (प्रतिनिधी):- मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदशनाखली आणि बीड जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 3 डिसेंबर 2024 रोजी पत्रकारांचे आरोग्य शिबीर सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी दिली. या संदर्भात जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांची भेट घेवून या शिबीराचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबीराची सर्व जबाबदारी डॉ.संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली असून,
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने महाराष्ट्रभर 3 डिसेंबरला दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांची आरोग्य तपासणी केली जाईल. या अनुषंगाने हे शिबीर बीड जिल्हा रुग्णालयात सकाळी 9 ते 3 दुपारी या वेळेत होणार असून या संदर्भात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांना पत्र देण्यात आले. या शिबीरामध्ये रक्तदाब, मधुमेह, इसीजी, रक्तगट आदींसह पत्रकारांच्या कुटूंबीयांसाठी महिला आरोग्य अधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या सर्व शिबीराची जबाबदारी डॉ.संजय राऊत सिव्हील हॉस्पटल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या शिबीराचा बीड तालुक्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन संभाजीनगर विभागीय समन्वयक सुभाष चौरे, परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, जिल्हा उपाधयक्ष रवी उभाळे, हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यु घरत,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय हांगे, संपादक राजेंद्र होळकर, हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका निमंत्रक मंगेश निटुरकर, समन्वयक लक्ष्मण नरनाळे, बीड तालुकाध्यक्ष दत्ता आजबे, कार्याध्यक्ष रेहान शेख, कोषाध्यक्ष प्रशांत लहुरीकर, सरचिटणीस प्रचंड सोळंके आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment