Wednesday, December 25, 2024

जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्य साठी पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर बीडमध्ये हातभट्टीवर धाड.

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले असून आज पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पो.नि. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाने आज पहाटे पात्रुड गल्ली भागातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर धाडी टाकल्या. यामध्ये रसायनासह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी शेकडो लिटर रसायन उध्वस्त केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बीड शहर ठाण्यातील डीबी पथकातील सपोनि राठोड, सहाय्यक फौजदार सिरसाट, पोहे तांबारे, पोशि सय्यद, मनोज परजणे हे आज सकाळी अवैध धंद्यांवरील कारवाईसाठी जात असतांना पात्रुड गल्ली भागातील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोनि बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 8 बाजण्याच्या सुमारास पात्रुड गल्ली भागात दोन ठिकाणी छापे टाकून सहा निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या डूम मधील शंभर लिटरचे रसायन व दोन पत्र्याच्या डब्यामधील 18 लिटरचे रसायन उध्वस्त केले तर दुसर्‍या कारबाईत पाच लिटरचे दोन ड्रम व इतर साहित्य उध्दवस्त करण्यात आले. या दोन्ही कारवाईत हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्न करण्यात आला असुन या प्रकरणी पो.ह. आजिनाथ सानप यांच्या फिर्यादीवरून राकेश प्रभाकर उर्फ गुडबा जाधव याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

No comments:

Post a Comment