परभणी (प्रतिनिधी) - परभणी शहरात एका समाज कंटकाने संविधानाची विटंबना केली या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदन दिले आणि घटनेचा निषेध केला.
या निवेदनात म्हटले आहे की, परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. सदर घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन आणि पोलीस दलाने तात्काळ योग्य कारवाई करायला हवी होती. मात्र ते न झाल्यामुळे आज परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
भारतीय संविधानाचा विटंबना ही अतिशय लज्जास्पद बाब आहे. या पूर्वीही भारतीय संविधान आणि आंबेडकरी प्रतीकांचा अपमान जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. या घटनेतील सर्व आरोपींना पोलिसांनी २४ तासांच्या आत तत्काळ अटक करावी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी. आरोपींना तत्काळ अटक न झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आरोपींना तत्काळ अटक करून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे ठोस प्रयत्न करावेत अशी विनंती ही या निवेदनात केली आहे.
यावेळी नेते अमितभाऊ भुईगळ, राज्य प्रवक्ता तय्यब जफर, जिल्हा अध्यक्ष सतीश गायकवाड, शहर अध्यक्ष पंकज बनसोडे, संदीप जाधव, मतीन पटेल, मेघानंद जाधव, काझी शकील, सतीश शिंदे आदी उपस्तिथ होते.
No comments:
Post a Comment