परळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी जिंनीग वर शासकीय कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री करावा व हमीभाव मिळवावा- सभापती सुर्यभान मुंडे
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे टोकवाडी येथे शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्था जिनिंग व प्रेसिंग फॅक्ट्री येथे परळी कृषी उत्पन्न बाजारच्या वतीने शासकीय कापूस सीसीआय केंद्रात परळी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपला कापूस सीसीआय खरेदी केंद्रावर विक्री करावा व शासनाच्या हमी भावाचा लाभ घ्यावा असे आवाहन मार्केट कमिटीचे सभापती सभापती सुर्यभान (नाना) मुंडे यांनी केले आहे.
सोमवार, दि.16/12/2024 रोजी सकाळी 11 वा. मार्केट कमिटीचे सभापती सुर्यभान (नाना) मुंडे, कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष व संचालक अॅड. विष्णुपंत सुभानराव सोळंके यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कापूस सीसीआय खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.
या शुभारंभ कार्यक्रमाला कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष व संचालक अॅड. विष्णुपंत सुभानराव सोळंके, बाजार समितीचे संचालक राजाभाऊ पौळ, संचालक सुरेश मदन मुंडे, संचालक राजेभाऊ गिराम, संचालक दत्ताराव त्रिंबकराव देशमुख, संचालक ज्ञानोबा (माऊली) गडदे, संचालक प्रभाकरराव दहिफळे, संचालक अॅड.रणजित सोळंके, संचालक मोहनराव सोळंके, सचिव बी.आर.रामदासी, हिशोबनिस गोविंद पाटलोबा मुंडे, अॅड.अमोल बा.सोळंके (चेअरमन, शेतकरी कापूस प्रक्रिया सहकारी संस्था जिनिंग व प्रेसिंग फॅक्ट्री ) आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना सूर्यभान (नाना) मुंडे म्हणाले की, शासकीय सीसीआय खरेदी केंद्रामुळे शेतकरी बांधवांचा कमीत कमी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलमागे फायदा होणार आहे, खासगी व्यापार्यांकडून शेतकर्यांची गळचेपी होत होती, आता ही गळचेपी होणार नाही, शेतकर्यांना त्यांचे पैसे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. भविष्यात शासनाने कापूस खरेदीची दरवाढ केली किंवा बोनस दिले तेही शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे.
कापूस पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष व संचालक अॅड. विष्णुपंत सुभानराव सोळंके यावेळी बोलताना म्हणाले की, कापूस उत्पादक परळी तालुक्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत, बाजारात शेतकरी कापूस विक्री करत होते, त्यामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते, परंतु आता सीसीआय केंद्रावर कापूस विक्री केल्यास शासकीय हमीभावाप्रमाणे त्यांना पैसे मिळणार आहेत, सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर विक्री केल्यास शेतकर्यांना चार ते पाच दिवसात पैसे मिळणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, कापूस उत्पादक शेतकर्यांनी आपला कापुस विक्री करावा व बाजार समितीचे नांव असलेली पक्की पावती घ्यावी. सदर शासकीय कापुस विक्री करीता शेतकर्यांनी कापुस पेरा नोंद असलेली 7/12, आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे जमा करावेत व सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर आपला कापूस विक्री करावा असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुर्यभान (नाना) मुंडे यांनी आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment