परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शहरातील विविध दिव्यांग लाभार्थीना दिव्यांगाचे नेते डॉ. संतोष मुंडे यांच्या हस्ते यु.डी.आय.डी.कार्डचे वाटप करण्यात आले. दिव्यांग हा सामाजिक अतिशय उपेक्षित घटक असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन डॉ. संतोष मुंडे यांनी केले.
शहरातील श्रीनाथ हॉस्पिटल येथे धनंजय मुंडे आरोग्य योजनेचे प्रदेशध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा दिव्यांगाचे कैवारी डॉ. संतोष मुंडें यांच्या हस्ते परळी शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना यु.डी.आय.डी.कार्डचे वाटप करण्यात आले. यामध्ये सय्यद जावेद आनि बाबा, सय्यद सुभान, साजन लोहिया, अनंत लोखंडे, जालिदर तुकाराम माने, महेमुद गफूर खान, सुरेश बळवंतराव माने, विशाल श्रीहरी चव्हाण, रामेश्वर अप्पासाहेब जाधव, महेबूब गौस सय्यद, शेख बाबू शेख शबीयाबी, शेख हिरा, रमजान राहिसाब खुरेशी, गौतम महादेव जगताप, शेख साजेद शेख मोदनद्दीन, शेख असोफ हसन, धनश्री गोविंद वेताळ, सय्यद रेघना अमिश, नाझिया अजिज शेख, शेख अब्दुल रेहमान, तुकाराम कोजळे व आदीचा समावेश आहे. डॉ. संतोष मुंडे म्हणाले की, दिव्यांग बांधवाच्या विविध अडचणी व समस्या आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने सोडवतो. आपण सातत्याने दिव्यांगांच्या उत्थानासाठी काम केलेले आहे. आजवर आपण अनेक दिव्यांगांनाच्या समस्या सोडवल्या आहेत. दिव्यांग बांधवनां साहित्य वाटप तसेच निधी वाटप असो की कुठलाही प्रश्न असो तसेच दिव्यांग बांधवांचा त्यांच्या प्रश्नांची अजिबात काळजी करू नये. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहून सोडवू असे यावेळी म्हणाले. दिव्यांगासाठी देशात एकच ओळखपत्र असलेले आयडी कार्ड म्हणजे यु डी आय डी कार्ड या यामुळे दिव्यांगला देशात कुठेही अडचणी निर्माण होणार नाही हे कार्ड त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. नियमानुसार जुनी असलेली दिव्यांग प्रमाणपत्र ही ऑनलाइन म्हणजेच सुधारित युनिक आय. डी. प्रमाणपत्र हे बंधनकारक आहे. हे कार्ड असल्यावरच कुठल्याही योजनेचा लाभ दिव्यांगांना मिळणार आहे. यु. डी. आय. डी. कार्ड वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी दिव्यांग बांधव व नागरिकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment