मुंबई (प्रतिनिधी) मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी रायगडचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर यांची तर सरचिटणीसपदी मन्सूरभाई शेख यांची निवड झाली आहे.. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत ते या पदावर असतील.. रायगडच्या पत्रकाराला परिषदेचे कार्याध्यक्ष होण्याचा बहुमान दुसरयांदा मिळत आहे.. यापुर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
मिलिंद अष्टीवकर रोहा येथून लोकमतचे काम करतात. गेली २० वर्षे ते परिषदेशी जोडलेले आहेत. कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आदि पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. परिषदेच्यावतीने ते अधिस्वीकृती समितीवर देखील होते. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांच्या हक्कासाठीच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी नेहमीच बिणीच्या शिलेदाराची भूमिका पार पाडली आहे.. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो.. मुंबई – गोवा महामार्गासाठी च्या कोकणातील पत्रकारांच्या लढ्यात त्यांची भूमिका नेहमीच निर्णायक होती.. एक स्पष्ट वक्ता, निर्भिड पत्रकार, चांगला संघटक अशी त्यांची ओळख आहे.
No comments:
Post a Comment