परळी वैजनाथ (प्रतिनिधी) संत श्री मन्मथस्वामी महाराज श्रीक्षेत्र कपीलधार यांच्या यात्रेनिमित्त विविध पालख्या कपीलधारहून परतीचा प्रवास करीत असून पालखीतील सहभागी वीरशैव सदस्यांसाठी महाराष्ट्र वीरशैव महासभेच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था मंगळवार दि.8 नोव्हेंबर रोजी बेलवाडी येथे करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र वीरशैव महासभेचे तालुकाध्यक्ष महादेव इटके यांनी दिली.
महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने श्री मन्मथस्वामी महाराज कपीलधार यांच्या पालखी सोहळयातील सदस्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष महादेव इटके यांनी दिली. मागील काही दिवसांपासून दररोज वेगवेगळया ठिकाणाहून कपीलधारकडे गेलेल्या पालख्यांचा परतीचा चालू आहे. या पालखींचा परळीतील श्री गुरूलिंगस्वामी मठ (बेलवाडी) मंदिरात विश्रांती थांबा असतो. यावेळी सर्व सदस्यांची सेवा म्हणून त्यांना चहा पाण दिले जाते. यावर्षी सुद्धा महाराष्ट्र वीरशैव सभेच्या परळी तालुका शाखेच्या वतीने चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment