केज (प्रतिनिधी) - केज तालुक्यातील समाज मंदिरात जुगार खेळणाऱ्या चार जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली.
केज तालुक्यातील साळेगांव येथील समाज मंदिरात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सोमवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशा वरून पोलीस नाईक राजू गुंजाळ आणि पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी अचानक धाड टाकली. त्यावेळी चौघे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या कडून जुगाराचे साहित्य आणि नगदी रोख १ हजारे ९०० रु. असा मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांच्या फिर्यादी वरून चौघांच्या विरुद्ध गु. र. नं. ५२५/२०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधकअधिनियम १२(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
No comments:
Post a Comment