Monday, November 14, 2022

शिवसंग्रामच्या पाठपुराव्याला यश धनेगाव फाटा ते धनेगाव रस्ता दुरुस्तीला झाली सुरूवात.


केज (प्रतिनिधी) तालुक्यातील धनेगाव फाटा ते धनेगाव रस्ता नादुरुस्त झाला होता,त्यावर अनेक खड्डे पाडल्याने यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.त्यामुळे हा रस्ता दुरुस्त व्हावा याकरिता शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून डॉ उत्तम खोडसे यांनी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता त्यास अखेर यश मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,मांजरा पट्ट्यातील रस्त्यांची दुरवस्था नेहमीच राहिलेली आहे.अधिकचा पाऊस आणि केलेल्या कामाची निकृष्ट दर्जा यामुळे धनेगाव फाटा ते धनेगाव/ नायगाव या रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झालेली होती.जागोजागी खड्डे पडले आहेत.पावसाळ्यात तर या खड्ड्याना डबक्याचे स्वरून आले होते ही बाब लक्षात घेऊन शिवसंग्रामचे युसुफ वडगाव सर्कल प्रमुख डॉ.उत्तम खोडसे यांनी हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता त्यास अखेर यश मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.

संबंधित कामासाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर कामाला सुरुवात झाली आहे.रस्ता दुरुस्तीचे काम चांगल्या दर्जाचे होणे गरजेचे आहे असे कंत्राटदार व अधिकारी यांना शिवसंग्रामचे डॉ. उत्तम खोडसे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment