तलवाडा (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत असून त्या करत असलेल्या कामकाजाच्या मानाने शासनाकडून त्यांना पुरेसे मानधन दिले जात नाही. अनेक आंदोलने करूनही राज्य आणि केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे आतातरी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासनाने न्याय द्यावा अशी रास्त मागणी अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे गेवराई तालुकाध्यक्ष - बापू गाडेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment