बीड (प्रतिनिधी) बीड गटविकास अधिकारी सानप ए.डी. पंचायत समिती, बीड यांच्या कर्तव्य कसूराने ग्रामपंचायत कुठेवाडी पो. बोरफडी ता.जि.बीड च्या अवैध कामाची चौकशी अपूर्ण विलंबाने होत असल्याबाबत. करिता दिनांक 11/11/2022 पासून अमरण उपोषण स्थजिल्हाधिकारी, कार्यालय, येथे या पुवीही शंभर वेळा अर्ज निवेदन विनंती करण्यात आल्या आहेत. परंतु प्रशासनातील कार्यवाही करणारे कार्यालय, अधिकारी, विषयातील प्रकरणात पाठराखण करताना दिसून येत आहेत ते कार्यालय अधिकारी पुढील प्रमाणे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, बोड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड, जिल्हाधिकारी जिल्हा बीड, अपर आयुक्त अपर विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या पत्रव्यवहाराचा लेखा जोखा केल्यास हा अनुचित प्रकार दिसून येतो.
ग्रामपंचायत कुठेवाडीच्या गैरकारभाराची तक्रार दिनांक 01/07/2021 ला वरील उल्लेखित कार्यालयाकडे केली होती. पंचायत समिती, बीड गटविकास अधिकारी यांनी आठ महिने कोणतीही कारवाई केली नाही. 8 एप्रिल 2022 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केल्याने पंचायत समितीने अधर्वट माहिती दिली या उपरान्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सात महिने सुनावणीत वेळ घालवला तात्पुरत्या स्वरुपात ग्रामसेवक ए.एस. शेळके यांना दोन वेळा निलंबित केले व अपर आयुक्त विभागीय औरंगाबाद यांना सरपंच सीमाबाई रामा बिटे विरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार प्रस्ताव पाठविण्यास मान्यता मिळावी असे कार्यालयीन पत्राद्वारे दिनांक 02 सप्टेंबर 2022 ला कळवले. ज्याचा दिनांक 02 सप्टेंबर 2022 असा आहे. ज्याचा पाठपुरावा केला असता अपर आयुक्त कार्यालयाचे पदाधिकारी जोशी यांनी आमच्याकडे पत्र आले, गट विकास अधिकारी सानप कारवाई साठी टाळता आहेत त्यांना निलंबित करून कारवाई करा त्यासाठी या आमच्या पुढील मागण्या आहेत या विलंबास जबाबदार असणारे गट विकास अधिकारी, कर्तव्यात कसूर करत असल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे.
कुठेवाडी ग्रामपंचायत चौकशी टिमचा प्रवास भत्ता ना मंजूर करण्यात यावा.चौकशी टिममध्ये नेमलेले कर्मचारी दिनांक 04/11/2022 रोजी प्रत्यक्ष जे हजर नव्हते त्यांना आदेश पालन न केल्याची नोटीस बजावण्यात यावी.
वरिष्ठाची परवानगी न घेता चौकशी स्थगीत करून पुढील चौकशीची तारीख तोंडी कळवतो हा शब्द प्रशासनातील नियमबाह्य असल्याने याची नागरी सेवा वर्तन अधिनियम कारवाई करण्यात यावी. उपोषण स्थळी होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहाल.. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शनिवारी सुट्टी देखील उपशा सुरू होते यामध्ये पूर्व सैनिक प्रकाश वाघमारे व गावातील बळीराम बजगुडे बसले आहेत.
No comments:
Post a Comment