Friday, November 11, 2022

ट्रॅक्टरच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू ; नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना.


नाशिक -  स्विफ्ट कार व ट्रॅक्टरचा भीषण अपघात या अपघातामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात  हा रात्रीच्या सुमारास झाला आहे. व अपघात झाला तेथे मोठे वळण आहे. यामुळेच अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये ट्रॅक्टर व स्विफ्ट कारचा समोरील भाग हा चकनाचूर झाला आहे. विशेष म्हणजे या अपघातामध्ये पोलीस कर्मचारी मृत पावले आहे.सदर अपघात हा येवला-नांदगाव रस्त्यावरील राजापूर गावानजीकच्या पन्हाळ पाटीच्या वळणावर रात्रीच्या सुमार घडला आहे.दीपक पाटील असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
ते सध्या नांदगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते.दीपक पाटील हे आपल्या स्विफ्ट कार MH 42 AS 6887 मधून नांदगाव वरून येवल्याकडे जात होते. येवल्याकडून येणाऱ्या ट्रॅक्टर ने  पन्हाळ पाटी येथे वळणावर असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. यात कार व ट्रॅक्टरच्या पुढील भागाचा पूर्ण चकनाचूर झाला. पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव व येवला पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी अपघात झालेले दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला केले व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

No comments:

Post a Comment