Tuesday, November 1, 2022

कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  कै. लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या मार्फत पोलादी पुरुषसरदार वल्लभाई पटेल यांची 146वी जयंती एकता दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष व  संस्थेचे अध्यक्ष मा.श्री संजय देशमुख यांची उपस्थिती महत्त्वपूर्ण होती. तसेच प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल एस मुंडे हे उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ.आर बी कल्याणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून या दिवसाचे महत्त्व विद्यार्थिनींना पटवून सांगितले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पी व्ही गुट्टे यांनी मानले.

No comments:

Post a Comment