Sunday, November 6, 2022

शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्याच फायद्यात.


नवी दिल्ली– नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेली पिक विमा योजना शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यासाठीच लाभकारी असल्याचं पाहायला मिळत आहे. दरवर्षी पाच हजार कोटी नफा कंपन्यांनी कमावला आहे.

शेत पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी 1 एप्रिल 2016 रोजी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली.खरीप हंगामातील पिकासाठी शेतकऱ्यांना 2 टक्के विमा रक्कम भरावी लागते तर रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के रक्कम भरावी लागते. मात्र आतापर्यंत पीक विम्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी विमा कंपन्यांनाच हजारो कोटी रुपये नफा मिळाला आहे.
विमा कंपन्यांनी यातून दरवर्षी तब्बल 5 हजार कोटी रुपयांच्या घरात नफा कमावल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पीकविमा कंपन्या हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत असतानाही शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिली जात नाही.रिलायन्स इन्शुरन्स आणि भारतीय कृषी विमा या दोन कंपन्यांनी सर्वाधिक नफा कमावला आहे. या नफेखोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावाही केला होता. मात्र यात कोणताही बदल झालेला नाही.2016 -17 या आर्थिक वर्षात 5 कोटी 23 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केल्यानं 21697 कोटी रुपयांची विमा रक्कम जमा झाली. नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 16807 कोटी रुपये देण्यात आले.2017-18
मध्ये 5 कोटी 32 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली. विमा कंपन्यांकडे 24597 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली त्यापैकी त्या वर्षी शेतकऱ्यांना 22142 कोटी रुपये देण्यात आले.
2018-19 मध्ये 5 कोटी 80 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला. त्यामुळे विमा कंपन्यांकडे 29693 कोटी रुपये जमा झाले. त्यापैकी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या दाव्याचा परतावा म्हणून 28464 शेतकऱ्यांना देण्यात आले.
2019-28 मध्ये पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली. 6 कोटी 24 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवल्यानं 32340 कोटी रुपये विमा कंपन्यांना मिळाले त्यापैकी परतावा म्हणून शेतकऱ्यांना 26413 कोटी रुपये देण्यात आले.
2020-21 या आर्थिक वर्षात 6 कोटी 23 हजार शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले. विमा कंपन्यांना यामुळं 31861 कोटी रुपये मिळाले. त्यापैकी शेतकऱ्यांचे 17931 कोटी रुपयांचे दावे मंजूर करण्यात आले. 2021-22 मध्ये पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ खरीप हंगामातील आहे.अनेक राज्य . 4 कोटी 98 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला. पीक विमा रक्कम म्हणून 18944 कोटी रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा झाली. त्यापैकी शेतकऱ्यांच्या नुकसानाचा परतावा म्हणून 7557 कोटी रुपये देण्यात आले.अनेक राज्य या योजनेतून बाहेर देखील पडली आहेत

No comments:

Post a Comment