Friday, November 11, 2022

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुषमा अंधारे यांनी भेट घेतली .




मुंबई (प्रतिनिधी)-तब्बल १०२ दिवसांनी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत याची जामीन झाली. शिवसेनेतील सगळ्यात लांब पल्ल्याची तोफ,तो गुरुतुल्य व्यक्तिमत्व खा.संजय राऊत यांच्या निवासस्थानी सुषमा अंधारे यांनी भेट घेतली.
    बऱ्याच दिवसानंतर मनमोकळ्या गप्पा झाल्या तब्बल १०२ दिवस मला पक्षात येऊन झालेत आणि तब्बल १०२ दिवसांनी सन्माननीय राऊत साहेब हे आमच्या सगळ्यांना भेटीसाठी उपलब्ध झालेत हा एक योगायोगच म्हणावा. परंतु, एक नक्की राऊत साहेबांच्या येण्याने खूप ताण कमी झाल्यासारखा वाटत आहे थोडेसे हलके वाटत आहे आणि सोबतच शिवसेनेची ताकद दहा पटीने वाढली आहे. असं भेटीदरम्यान शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे म्हणाल्या.
   तसेच पुढे त्या म्हणाल्या की, सर आम्ही खारीचा वाटा उचलायचा प्रयत्न केला. आमच्या- आमच्या परीने खिंड लढवली फार मोठे काही नाही केलं. रावसाहेब उत्तरले हे तुम्ही निकराने लढलात ही खींड देखील म्हणजेच ती पावनखिंड झाली.. यासारख्या एका छोट्या शिवसैनिकांसाठी ही फार मोठी पोच आहे.

No comments:

Post a Comment