Tuesday, November 15, 2022

बाल दिनानिमित्त प्रभाग क्र. 16 मध्ये बालकांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप संपन्न.


*रायुकाँचे शहराध्यक्ष सय्यद सिराजभाई यांचा उपक्रम; शेकडो बालकांनी घेतला शिबीरात सहभाग; सिराजभाई यांच्या कार्याचे नागरिकांनी केले कौतुक. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) भारताचे माजी पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त तसेच बाल दिनाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सिराजभाई आसिफ अली यांच्या वतीने इस्लामपुरा बंगला येथे आज  बालकांची मोफत तपासणी उपचार व औषधी वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाबद्दल सय्यद सिराजभाई यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
आज मंगळवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी परळी शहरातील प्रभाग क्रमांक 16 इस्लामपुरा बंगला या भागात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार, ज्येष्ठ नेते वाल्मीकांना कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सिराजभाई यांच्या वतीने बालकांची मोफत आरोग्य तपासणी, उपचार तसेच औषधी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन नवजीवन हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ गुरुप्रसाद देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मुक्ती सय्यद अश्फाक तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा प्रसिद्ध इतिहास तज्ञ न विनोद जगतकर सर हे उपस्थित होते. 
याप्रसंगी उपस्थितांना बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मुक्ती सय्यद अशपाक म्हणाले की, आज बाल दिन असून या दिनाचे औचित्य साधून बालकांची आरोग्य तपासणी उपचार तसेच मोफत औषधी वाटप कार्यक्रम राबवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद सिराजभाई यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे समाजाप्रती असलेले प्रेम यातून दिसून येत असल्याचे सांगून यापुढेही असेच सामाजिक उपक्रम सय्यद सिराज भाई यांनी राबवावेत असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान आज झालेल्या मोफत बालरोग शिबिरात इस्लामपूर भागातील व परिसरातील शेकडो बालकांची आरोग्य तपासणी चार व मोफत औषधी वाटप करण्यात आली. कार्यक्रमास प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment