दिंडोरी (प्रतिनिधी) दिंडोरी तालुक्यातील एक गावामध्ये चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे. यामध्ये एका लहान मुलीच्या डोक्याला बंदूक लावून सदर चोरी करण्यात आली आहे. यामध्ये सहा ते सात दरोडेखोर असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये आलिशान गाडीसह 14 ते 15 लाखांची लूट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पहाटे पहाटे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. दिंडोरी तालुक्यातील मनोरी शिवारात रात्रीच्या 1 ते दीड वाजेच्या सुमारास एक बंगल्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. रतन शिवाजी बोडके यांच्या बंगल्यावर सदर दरोडा पडला आहे. शिवकमल असे नाव सदर बंगल्याचे नाव आहे सदर बंगला दोन मजली आहे.
तालुक्यातील ढकांबे शिवारात सहा ते सात दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाक दाखवून 14 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना उघडकीस आली आहे आज आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला 14 वर्षाच्या मुलीच्या डोक्या ला बंदूक लावून सहा ते सात दरोडेखोरांनी ही लूट केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे,आलिशान कारसह 60 ते 70 तोळे सोने लंपास केले आहे. 8,50, 000 रोख रक्कम , 28 तोळे सोने, 480 ग्रॅम चांदी अशी एकूण 14 ते 15 लाख रुपयांची चोरी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे, पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस उप अधीक्षक भोसले, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, दिंडोरी पो. ठाणे व स्टाफ, फिंगर प्रिंट ब्युरो, डॉग युनिट, तांत्रिक विश्लेषण शाखा अशा तपास यंत्रना घटनास्थळी दाखल झाल्या असून शोध सुरू आहे.




No comments:
Post a Comment